"बेभान मनाच्या लहरी...!"
ओसाड माळरानावर,
एकांतात भटकंतीने,
फिरत रहाणा-या,
एकांतात भटकंतीने,
फिरत रहाणा-या,
बेभान मनाच्या लहरी...!
बेभान मनाच्या लहरी...!
सागरी किना-यावरती,
उसळत्या लाटांमध्ये,
शांत रमणा-या;
शांत रमणा-या;
नदी किना-यालगत,
वाळुच्या ढिगा-यात,
कलाकृती करणा-या,
बेभान मनाच्या लहरी...!
बेभान मनाच्या लहरी...!
माळरानावर फिरुनी चौफेर,
बोभाटपणे हिंडुन दुरवर,
वायु गतीने सैरावैरा पळणा-या,
आकाशी आकांक्षांच्या,
आकाशी आकांक्षांच्या,
उंच झेपा घेणा-या,
अन् अचानक स्तब्ध होणा-या,
बेभान मनाच्या लहरी...!
बेभान मनाच्या लहरी...!
कल्पकतेची जोड,
अन् विचारांचा पाझर,
सगळीकडेच नाचणा-या;
नासे ऱृतुंचा आसरा, ं
वा ना असे प्रेमाचा झरा,
तरी सर्वच टिपुन घेणा-या,
बेभान मनाच्या लहरी...!
बेभान मनाच्या लहरी...!

माझा पहिला काव्यसंग्रह
ReplyDelete