"जीवन जगतांना"
जीवन जगतांना....!
कधी असतं हसायचं तर कधी असतं रडायचं,
जीवनाच्या आनंदासाठी ध्येयाच्या बळावर असतं लढायचं,
जीवन जगतांना....!
कधी कुणाला असतं खुलवायचं, तर कधी भुलवायचं,
सुखाच्या क्षणांसोबत, दु:खाच्या अश्रुंनाही थोडं भिजवायचं,
जीवन जगतांना....!
खरं तर यशासाठीच असतं ताकदीन झटायचं,
कधी अपयशही आलं तर पुन्हा असतं ऊठायचं,
जीवन जगतांना....!
एखाद्या प्रसंगावधानातुन आपण असतं सावरायचं,
आलाच प्रसंगात तर त्या दु:खातुन मनाला आवरायचं,
जीवन जगतांना....!
एकमेकांच्या मनातील भावनांना असतं जपायचं,
प्रत्येकाचं नातं हे प्रेमानं असतं शिंपायचं,
प्रत्येकाचं नातं असतं प्रेमानं असतं शिंपायचं.

No comments:
Post a Comment