Saturday, January 12, 2019

काजवा

"काजवा" 



हिरवा शालु पांघरलेला,

सृष्टीचा मन मोहक पसारा,
सायंकाळच्या रम्य वेळी,
तो एक काजवा चमचमणारा,



त्याच शांततेच्या वतावरणात,

काही आठवणी आल्या मनात,
वा-याच्या एका झुळुकी बरोबर,
काही स्मृती ठेवुनी गेल्या ऊरात,



वेळेचे भानही ना राहिले,

मीही डुंबुन गेलो विचारांत,
अन् अचानक लावुन गेलो,
काजव्यांच्या लखलखणा-या प्रकाशात



कुठून आला होता तो समय,

मनाला भुरळ घालणारा,
त्यातच मनही वेधुन घेत होता,
तो एक काजवा चमचमणारा



स्वत:ला सावरण्याच्या ओघात,

स्तब्ध झाला समय पळणारा,
पण त्या गरगरणा-या अंधारात होता,
तो एक काजवा चमचमणारा,
तो एक काजवा चमचमणारा.

No comments:

Post a Comment