"हक्क आहे मला"
हक्क आहे मला,
तुझ्याकडे बघण्याचा,
तुझ्या नजरेत नजर मिळवण्याचा,
हक्क आहे मला,
तुझे सौदर्य न्याहाळण्याचा,
तुझ्या सौदर्याची स्तुती करण्याचा,
हक्क आहे मला,
तुझ्या विषयी प्रेम भावना रंगवण्याचा,
तुझ्या प्रेमाच्या नशेत बुडुन जाण्याचा,
हक्क आहे मला,
तुझ्या विषयी स्वप्न पहाण्याचा,
तुझ्या मायेच्या कुशीत रहाण्याचा,
हक्क आहे मला,
तुझ्या डोळ्यांत मला शोधण्याचा,
तुझ्या नजरेत मदहोश होण्याचा,
हक्क आहे मला,
तुझ्या हातात हात मिळवण्याचा
तुझ्या मनात माझी प्रेमभावना रुजवण्याचा,
तुझ्या मनात माझी प्रेमभावना रुजवण्याचा,
तुझ्या मनात माझी प्रेमभावना रुजवण्याचा.

No comments:
Post a Comment