"आरंभ तुझ्या प्रेमाचा"
एके दिवसी तु दिसलीस,
अन् मन अगदी भांबावुन गेलं,
पण तरीही मनात नेहमी सारखं,
एक गुपीत अचानक येऊन गेलं,
मनाला हे असं काय झालं?
पुन्हा मी त्या दिशेला पाहीलं,
पण मला तिथं कोणी नाही दिसलं,
मला थोडं भांबवल्या सारखं झालं!
म्हणुन मनही अगदी बावरुन गेलं,
पण तेवढ्यातच पुन्हा अचानक,
तुझं बोलणं माझ्या कानावर पडलं,
इतक्यात मी ही डोकावुन पाहीलं,
तेव्हा तुझं हसणं मनाला लाजवुन गेलं,
तुझ्या त्या स्मित हास्याच्या आठवणीत,
अंगाला बारिकसा शहारा येवुन गेला,
तुझ्या भेटीची ओढ तर होतीच,
पण शेवटी तुझा मोह झाला,
तुझ्या त्या स्मित हास्याच्या आठवणीत,
अंगाला बारिकसा शहारा येवुन गेला,
तुझ्या भेटीची ओढ तर होतीच,
पण शेवटी तुझा मोह झाला,
तु तिथुन निघुन गेलीस!
तु तिथुन निघुन गेलीस,
तु तिथुन निघुन गेलीस,
पण तरीही मनाला तुझी ओढ होती,
का कुणास ठाऊक पण?
पुन्हा तुझ्या येण्याची आशा होती,
वाटत होतं पुन्हा तु यावंस,
अन् आपल्या नात्याला एक नाव द्यावं,
अन् आपल्या नात्याला एक नाव द्यावं.


















