"कुणी तरी हवं असतं"
कुणी तरी हवं असतं,
आपलंसं म्हणनारं,
स्वतं: पेक्षाही आपल्यावर,
जीवापाड प्रेम करणारं,
कुणी तरी हवं असतं,
आठवणीत येणारं
हुरहुरणा-या मनाला,
बेचैन करुन टाकणारं,
कुणी तरी हवं असतं,
हृदयात आपल्या रहाणारं,
जरी हृदय फाटलं तरी,
कधीच गळुन न पडणारं,
कुणी तरी हवं असतं,
नजरेत आपल्या सामावणारं,
कधी मिटले जरी डोळे,
तरी स्वप्नातही येणारं,
कुणी तरी हवं असतं,
नातं आपलं जपणारं,
जीवनसागराच्या डोहात,
जीवाला जीवही देणारं,
कुणी तरी हवं असतं,
कुशीत घेऊन कवटाळणारं,
धावणा-या त्या मनालाही,
आपल्या मिठीत घेणारं,
कुणी तरी हवं असतं,
संगतीनं आपल्या चालणारं,
चालता चालता लागलीच ठेच,
तरी अलगदपणे झेलणारं,
कुणी तरी हवं असतं,
आपलंही आयुष्य सावरणारं,
नशीब बदलत नसले तरी,
आपल्या कर्तुत्वानं बदलणारं,
असंच कुणी तरी हवं असतं,
असंच कुणी तरी हवं असतं.

No comments:
Post a Comment