"मला मरुनही उरायचं आहे"
मला माझ्या या जीवनात,
असं काही करायचं आहे,
की आठवणीत असलो पाहीजे जनांच्या,
कारण, मला मरुनही उरायचं आहे!
दीन- दुबळ्यांच्या सेवेसाठी,
संघर्ष मला करायचा आहे,
अडलेल्यांना मदतीचा हात मला द्यायचा आहे,
कारण, मला मरुनही उरायचं आहे!
दु:खाच्या वाटेवरुन जाणारी,
सुखाची वाट मला शोधायची आहे,
भंगलेले स्वप्न पुन्हा फुलवायचं आहे,
कारण, मला मरुनही उरायचं आहे!
समाज विकासाच्या आड येणा-यांशी,
न्यायाचे युद्ध मला करायचे आहे,
अन्यायाचा डोंगर ध्यैर्याने बाजुला सारायचा आहे,
कारण, मला मरुनही उरायचं आहे!
माझं जीवन असंच अचानक संपणार आहे,
क्षणभंगुर असलेल्या या जीवनात,
मोलाचं स्थान मला मिळवायचं आहे,
कारण, मला मरुनही उरायचं आहे!
कारण, मला मरुनही उरायचं आहे.

No comments:
Post a Comment