"नातं"
दोन हृदयांचं नातं जुळलं
घडला काही दिवसांचा सहवास,
मनामध्ये दरवळतो अजुनही,
तुझ्याचं प्रितीचा सुवास;
जेव्हा सोबतीला तू असतेस,
तेव्हा ऊन्हातही गारवा भासतो,
दिसत नसतं काही तेव्हा मात्र,
काळोखातही ऊजाळा दिसते;
दोन मने एकत्र जोडणारा,
प्रितीचा हा नाजुकसा धागा,
हृदयातील हाकही ऐकते,
डोळ्यांच्या नात्यांची भाषा;
मनामध्ये प्रितीची सदैव,
बाग फुललेली असते,
नात्यांच्या त्या बंधातही,
जणु ती गुंफलेली असते,
ब-यापैकी निरखुनही,
काहिंना ते दिसत नसतं,
कधी पुसुनही ते पुसत नसतं,
कारण ते फक्त नातं असतं,
कारण ते फक्त नातं असतं.

No comments:
Post a Comment