"तो आणि ती"
तो एक प्रियकर असतो,
एक दिवस तिच्यावर खटकतो,
मनात आपल्या राग घेऊन,
मग एकटाच भटकतो,
ती त्याची लाडकी प्रियसी असते,
त्याच्या शोधात निघते,
दुरवर भटकत जाते,
आपल्या प्रेमापोटी त्याचा शोध घेते,
तो एकटाच बसला होता,
एका लहानशा झाडाखाली,
त्या झाडाची एक फांदीच,
त्याला हवेचा झोका घाली,
ती मगुन निघाली होती,
तुडवत होती रानावनांना,
घाईघाईतच चालत होती,
शोधीत त्याच्या पाऊलखुणा,
तो नि स्तब्ध बसला होता,
मनात होते विचारांचे वादळ,
रागाचे सुस्कारे सोडताच,
मनही करत होते धावपळ,
ती घाब-या चेह-यातच,
इकडे तिकडे बघत होती,
कुठे दिसतो कुठे नाही,
फक्त त्याचाच शोध घेत होती,
तो एकटक वाटेकडे बघत होता,
त्याला आशा होती तीच्या येण्याची,
नाराज तर तो होता खरा,
पण जाणीव होती त्याला प्रेमाची,
ती थोड्या पुढे येऊन थांबली,
अचानक तो तिला दिसला,
एकदम शांत होऊन मग तीने,
सुटकेचा निश्वास सोडला,
तो तीच्याकडे बघुन थोडा बावरला,
मनाने आपल्याच मनात कोसळला,
इकडुन तिकडे बघितल्यावर,
स्वत:च एकदम सावरला,
ती त्याच्याकडे बघुन,
नजर झुकवत होती,
घाबरलेल्या मनाने,
नजर त्याची चुकवत होती,
तो तिच्याकडे रागानेच बघत होता,
स्वत:च्याच मनात काही बडबडत होता,
ती त्याच्याजवळ आल्यावर,
अजुनच रुसण्याचा त्याचा बेत होता,
ती त्याच्या जवळ येऊन बसली,
त्याच्याकडे नजर वळवुन म्हणाली,
काय झालं तुला माझ्यावर रागवायला,
बोलण्याची हिम्मत नव्हतीच, पण बोलली,
तो ऊद्गारला, इथे कशाला आलीस,
नाकावर राग दाखवुन तो म्हणाला,
मला तुझ्याशी काही बोलायचं नाही,
मी विसरुन जातो तुझ्या प्रेमाला,
ती म्हणाली, रागवु नकोस माझ्यावर,
जीवापाड आहे प्रेम तुझ्यावर,
तुझ्याच साठी आलोय मी इथे,
खरंच ठेव विश्वास माझ्यावर,
तो मग शांत होऊन म्हणाला,
मला ही वाईट समजु नकोस,
प्राण देईन आपल्या प्रेमासाठी,
पण जीवनात कधी रडवु नकोस,
तीही हवालदिल झाली,
त्याच्या कुशीत बसली,
डुंबुन गेले प्रेमाच्या ओघात दोघेही,
तो आणि ती,
तो आणि ती.

No comments:
Post a Comment