Saturday, January 12, 2019

काळोख

"काळोख" 



काळोख म्हणजे स्तब्धता,
काळोख म्हणजे शांतता,
काळोख म्हणजे एकांतात,
काळोख म्हणजे निवांत,



सुमसान विचारांच्या मनाला,
चाहुल लागते ती काळोखाची,
थिरकाणा-या विचारांच्या कुशीत,
भीती वाटत असते ती उजेडाची,



काळोख म्हणजे मातीचा ऊबारा,
काळोख म्हणजे स्नेहाचा गाभारा,
काळोख म्हणजे स्मृतीचा हिवाळा,
काळोख म्हणजे जिवनाचाउजाळा,



काळोख म्हणजे चिंतन,
काळोख म्हणजे मनन,
काळोख म्हणजे कल्पना,
काळोख म्हणजे स्वप्न,



काळोखाची भीती कशाला,
काळोखाशी झुंज हवी,
काळोख म्हणजे रात्र नव्हे,
तर काळोख म्हणजे पहाट नवी,
तर काळोख म्हणजे पहाट नवी.




No comments:

Post a Comment