"खरंच तु येशील ना....?"
मी अजुनही आहे तिकडे,
तिथेच त्या झाडाखाली,
वाट बघतोय तुझी,
त्याच नेहमीच्या ठिकाणी,
खरंच तु येशील ना....?
तुझ्या नेहमीच्या येण्याच्याच,
वाटेकडे नजर माझी,
सारखी एकटक लागलेली,
तुझ्यााठी व्याकुळ झालेली
खरंच तु येशील ना....?
तिथेच आहे अजुन मी,
वाट बघतोय तुझ्या येण्याची,
समजुत घालतोय मनाची,
आस आहे तुझ्या येण्याची,
खरंच तु येशील ना....?
नयन माझे थकले,
वाट तुझी पाहतांना,
अजुनही आशा तुझ्या येण्याची,
खरंच तु येशील ना?
खरंच तु येशील ना? ॉ
खरंच तु येशील ना?
खरंच तु येशील ना? ॉ

No comments:
Post a Comment