"तुझे मनमोहक रुप"
कधी कधी असं वाटतं,
कुशीत तुझ्या बसुन रहावं,
गवतावरच्या दवबिंदु प्रमाणं,
रुप तुझं न्याहाळुन पहावं,
स्मीत आहे मधुर तुझं,
जसं कळीतुन फुल उमलावं,
मऊ गो-या गालांवरुन जणु,
कोण्या सुंदर परीचं रुप दिसावं,
देखणे आहेत नयनही तुझे,
अगदी सागरी मोत्यांसारखे,
काळोखातही चमकुन दिसावेत,
आसमानी चमकती ता-यांसारखे,
केसांचा रंगही अगदी काळा,
मेहंदीच्या मोहक कळ्यांप्रमाणे,
लावण्यवती हे रुप तुझे,
रातराणीच्या वृक्षा प्रमाणे,
तुझ्या या मनमोहक रुपात,
मी अगदी बेदुंध होऊन गेलोय,
निष्पाप अशा माझ्या हृदयाला,
तुझ्या प्रेमाच्या भट्टीत कोलुन गेलोय.

No comments:
Post a Comment