"प्रेमात तुझ्या पडल्यावर...!"
प्रेम हे किती अल्हाददायी असतं,
उलगडतं ते अनपेक्षीत घडल्यावर,
प्रेमाचं हे व्यापकरुप समजलं मला,
प्रेमात तुझ्या पडल्यावर......!
प्रेमानं तुझ्या मनाला अगदी,
वेडंपिसं करुन सोडलं आहे,
सुचत नाही तुझ्या वाचुन काही,
असं कसं जीवनाचं कोडं आहे,
खरंच सांगतो मी तुलाही
विश्वास ठेव जरा माझ्यावर,
गहीवरुन जाऊ नकेस कधी तू,
माझं तर प्रेम आहे फक्त तुझ्यावर,
आयुष्यात आता तुझ्याशिवाय मला,
कोण सापडंल समजुन घेणारं,
विश्वासाचं हे नातं आपलं, ा
मी नाही कधी तोडणारं,
किती दु:ख होतं मनाला,
एकमेकांपासुन दुरावल्यावर,
हे देखिल उमगलं मला,
प्रेमात तुझ्या पडल्यावर......!

No comments:
Post a Comment