Saturday, January 19, 2019

तुझा शृंगार

"तुझा शृंगार" 


तुझा तो गुलाबी रंगाचा ड्रेस,

त्यात दिसणारा तुझा वेश,
मनाला अगदीच मोहुन टाकतो,
मग मनात असंख्य विचारांचा वादळ ऊठतो,


पायातील पैंजणांचा झंकार,

आणतो अंगावर शहार,
नजरेत भिडणारी तुझी नजर,
करुन टाकते शरीराची थरथर,


मनाला मोहुन टाकणारी तुझी चाल,

खरंच करते मला अगदी बेताल,
त्यात तुझं देखणं रुपही बेमीसाल,
कसं सांगु तुला करतंय माझे किती हाल,


तुझ्या ओठात भरलेला गुलकंद,

त्याचा मनाला लागलाय छंद,
तुला अशा मनमोहक रुपात बघुन,
होतेय माझीही बोलतीच बंद,


भासतेस एखाद्या परी सारखी,

नटलेल्या सुंदर नटीसारखी,
जुळेल का आपल्या मनांची तार,
खरंच मोहुन टाकतो तुझा शृंगार,
खरंच मोहुन टाकतो तुझा शृंगार.

No comments:

Post a Comment