Wednesday, January 16, 2019

बालपण

"बालपण" 

बालपण म्हणजे...!
स्वैराचाराने धावणारे मन,
प्रत्येकाच्या वाट्याला येणारे,
असंग्रहित सोनेरी धन!

बालपण म्हणजे...!
लहरी तरंगांचे समाधान,
जनुकाही त्याच्याच मुठीत,
सामावलेले अथांग आसमान!

बालपण म्हणजे...!
नाविन्य शोधातील जीव,
स्वप्न पुर्तीच्या आशेसाठी,
प्रत्येकालाच येणारी किव!

बालपण म्हणजे...!
सोनेरी झुडुपातील हिरवळ,
सुगंध नसतांनाही,
चोहीकडे पसरणारी दरवळ!

बालपन म्हणजे...!
सर्वांना हवाहवासा वाटणारा
एक मनमोहक अविष्कार,
ज्यावर असतो प्रत्येकाचा अधिकार,
ज्यावर असतो प्रत्येकाचा अधिकार! 

No comments:

Post a Comment