Sunday, January 13, 2019

ऊन हिवळ्यातल

"ऊन हिवाळ्यातलं" 

ऊन्हाचा रंग कसा सोनेरी पिवळसर दिसणारा,
हिवाळा असतो असा मनाला मोहुन टाकणारं,

सुर्याच्या किरणांनी जणु खिडकितुन आत पहावं,
अन् कुंडलितल्या पानांनी अचानक चमकुन जावं,

अशातच एकदम आपल्या मनात क्षणीक गोडवा यावा,
मग अनोळखी पावलांच्या ओलसर श्वासाचा स्पर्श व्हावा,

आपण मग त्यांना मैत्रीपुर्ण दृष्टीभेट करुन द्यावी,
अन् ऊन्हानं गोड मनानं आपली पाठ शेकत रहावी,

अचानक त्या ओलसर पावलांच्या स्पर्श निघुन जावा,
मग मात्र ऊन्हानेही आपला रंग बदलत रहावा,

झाडाची पानं कुरवाळत त्यानं सर्वत्र सांडावं,
अन् हिवाळ्यातलं नाजुक ऊन मनांत भरावं,

थंडीच्या रात्रीत अचानक मनात स्वप्न जागं व्हावं,
स्वप्न पाहता पाहता स्वप्नांच्या दुनियेत भरकटावं,

स्वप्नांच्या दुनियेतुन इकडे तिकडे सैरावैरा हिंडावं,
पण त्या स्वप्नवत प्रसंगात आपण प्रत्यक्षात नसावं,

अचानक आपल्याला पहाटेची जाणीव व्हावी,
अन् आपल्याला ऊन्हाची आस लागुन रहावी,

कसं घडवुन आनतं कोडं आपल्या मनातलं,
ते स्वानंदी सोनेरी ऊन हिवाळ्यातलं,

सकाळच्या कोवळ्या किरणांनी मन प्रफुल्लीत करणारं,
नाजुक साजुक हवंहवंस वाटणारं ऊन हिवाळ्यातलं,
नाजुक साजुक हवंहवंस वाटणारं ऊन हिवाळ्यातलं.


No comments:

Post a Comment