Saturday, January 12, 2019

मैत्री

"मैत्री"

मैत्री म्हणजे काय असते,
दोन जीवांच ते नातं असतं,
अश्विनात हर्षानं फुलणा-या,
गवताचं ते नाजुक पातं असतं!

मैत्री म्हणजे काय असतं,
तृणाची ती प्यास असते,
दोन जीवांच्या मिलनाची,
अनोळखी ती रास असते!

मैत्री म्हणजे काय असतं,
कोकिळेचा मधुर नाद असतो,
हृदयातुन घातलेली एक,
ओढीची ती साद असते!

मैत्री म्हणजे काय असतं,
स्वार्थाचा तो त्याग असतो,
सुख दु:खाच्या जीवनाचा,
नाजुकसा तो भाग असतो!

मैत्री म्हणजे काय असतं,
मैत्री म्हणजे जीवन असतं,
मैत्री म्हणजे जीवन असतं.

No comments:

Post a Comment