"तिच्या पापण्यांतील पाणी"
ती मागे वळुन पाहताच,
मी तीच्या डोळ्यांत निरखुन पाहीलं,
ती नाजुकशी हसली,
अन् तीच्या डोळ्यांत पाणी भरलं,
तेव्हा मी तीला म्हणालो,
पुसुन घे ते डोळ्यांतले पाणी,
पुन्हा भेटेन न् भेटेन,
पण जवळ असतील तुझ्या आठवणी,
मग जपुन ठेव मला हृदयात,
मी दिलेल्या शब्दाच्या पाकळ्या,
केव्हा तरी उलगडुन पुन्हा,
त्याही वाचता येतील तुला,
माझ्याकडे बघुन ती,
पुन्हा नाजुकशी हसली,
तीच्या डोळ्यांतुन गळालेली आसवे,
तेव्हा तीच्या गालावर विसावली,
दिवस निघुन जात होते,
येत होत्या तीच्या आठवणी,
मनाला बेचैन करुन जात होते,
तीच्या पापण्यांतील पाणी,
तीच्या पापण्यांतील पाणी.

Bebhan manachya Lahari...!
ReplyDelete