नातं
दोन हृदयाचं नातं जुळलं,
घडला काही दिवसांचा सहवास,
मनामध्ये दरवळतो आता,
फक्त तुझ्याच प्रीतीचा सुवास,
जेंव्हा सोबतीला तू असतेस,
तेंव्हा उन्हातही गारवा असतो,
रात्रीच्या गर्द कळोखातही,
तुझ्या सहवासाचा उजाळा भासतो,
दोन मने जोडणारा,
प्रीतीचा हा नाजुक धागा,
हृदयाची ही ती हाक ऐकते,
डोळ्यांच्या नात्याची भाषा,
मनामध्ये सदैव प्रितीची,
बाग फुललेली असते,
नात्यांच्या बंधनातही ती,
कधी कशी गुंफलेली असते,
काही वेळा निरखूनही,
लोकांना ते दिसत नसतं,
कधी पुसूनही ते पुसत नसतं,
कारण, ते फक्त नातं असतं...!





